आज खूप दिवसानी माझा मित्र आदित्य घरी आलेला . तो घरी आला तेव्हा मी फोनवर बोलत होते. त्याला हातानेच बसायाची खूण करून मी त्याच्या कडून थोडा वेळ मागून घेतला. त्याने देखील खूणेनेच तो घाईत असाल्याचे सान्गितले. आदित्य माझा शाळेपासूनचा मित्र. आम्ही दोघे हि राहायला एकाच कॉलोनीत असल्याने आणि आमच्या साहित्यातल्या आवडी-निवडी तशा सारख़्या असल्याने, आमची मैत्री अज़ून ही छान टीकून आहे. त्याच्याशी बोलल्यावर आजूबाजुला घडणाऱ्या काही गोष्टिंवर चर्चा होते आणि आमच्या मते सून्न पड़त चालेलल्या आमच्या मेंदुला ज़रा चालना मिळते.
मी फोन ठेवला आणि आदित्यने सूटकात्मकस्मीत केले. या वेळेस मी त्याला मुद्दामच बोलावलेले. तो लिहतो, चांगल्या प्रतिचे लिहतो आणि असच काहीतरी चांगल लिखाण मला त्याच्या कडून हवे होते. त्यावर बरेच दिवासात काही लिहले नसल्याचे तो म्हणाला. साहजिकच मी त्याला का विचारले – तर म्हणाला - अग जमत नाहिए. मी फार वेळा प्रयत्न करतो पण त्या साठी जी एक स्पेस हवीये तीच हरवलीये अस वाटतंय. कसा लिहू? सकाळी M.sc. ची लेकचर्स असतात . दुपारी प्रक्टीकॅल्स असतात. संध्याकाळी क्लास ! दिवस असाच संपून जातो . रात्री घरी आल्यावर जेवायचे. सकाळचा पेपर पण हल्ली रात्री जेवताना चाळतो.
घरी आल्यावर अंगात त्राण रहात नाहीत आणि मेंदू विचार पण करत नाही. . I’m really looking for a space from all these. !”
त्याचा कष्टी चेहरा पाहून यावर आणखी खोलात न जाता,' बऱ, प्रयत्न सुरू ठेव ’ इतकेच म्हंटले. तो हसला आणि निरोप घेऊन निघाला.
रात्री जेवत असताना नुकतीच अकरावीत admission घेतलेली माझी बहिण फिझीक्सची गणिते सोडवत बसलेली. आईने दोनदा जेवायला बोलावून झालेले तरीहि तिचे काम सुरुच होते. आईने पुन्हा एकदा तिला बोलावल्यावर ती आईला म्हणाली," तू भरवणार असशील तरच आत्ता जेवेन नाहीतर नंतर ! no space for anything else !" मी बहिणीकडे जरा आठ्या पाडून च पहिले, तिने हि कार्य तत्परतेने लगेच मला अगाऊ smile दिले .
जेवणानंतर सारे आटोपल्यावर मी इंटरनेट वर एका मैत्रिणी शी chat करत बसले होते. आता माझ्या या मैत्रिणीला आमच्याच ग्रूप मधला एक मुलगा आवडतो. ह्या दोघांची तशी फार ओळख नाहीये पण मैत्रिणी कडून ओळख वाढवण्याचे सध्या बर्र्यापैकी प्रयत्न सुरू आहेत. आज तिचे काहीतरी बिनसलेय हे एकंदरीत मला तिच्या बोलण्यातून जाणवत होते. मी विचारायची खोटी; तिने लगेच मन हलक केलं. तिच्या म्हणण्यानुसार तो आज सकाळपासून तिच्याशी 'नेहमीप्रमाणे' बोलला नाही , अगदी मगाशी ऑनलीन असताना पण काही reply दिला नाही. आता यावर मी काय बोलणार ? तिला मी कसबसे समजावण्याचा प्रयत्न करत होते पण, प्रेम आंधळ असतं, मन वेड असतं. मुली स्वप्नाळू असतात आणि हि देखील त्यातलीच एक आहे, हे मी समजून गेले. मग एक, दोन, तीन, चार करत सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यंत सारी दुखभरी कर्मकहाणी सांगून झाल्यावर ती मला म्हणाली "you know what? i have no space in his life" :( मी तिला थोडे शांत केले पण मलाहि माहिती होते, इस बिमारी पर दवा का असर ज्यादा देर नही चलेगा.
रात्री झोपायला आल्यावर मात्र हे तिन्ही प्रसंग सारखे आठवू लागले. घटना खूप वेगळ्या होत्या पण त्यातल्या प्रत्येकाला एक space हवी होती जी त्याला हवी तशी मिळत न्हवती.
आदित्य ला स्वतःसाठी मिळत न्हवती, बहिणीला जेवणासाठी मिळत न्हवती तर मैत्रिणीला तिला आवडणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात स्पेस मिळत न्हवती. हा स्पेस काय प्रकार आहे? मला पण हवी आहे का? प्रत्येकाला हवी असते का?
काय असत स्पेस म्हणजे ? जागा, वेळ, मोकळीक का आणखी काही? शब्द एकच पण प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा. मैत्रिणीला space म्हणजे 'जागा' हवी होती, बहिणीला space म्हणजे 'वेळ' हवा होता, मित्राला space म्हजे 'मोकळीक' हवी होती.
मला जे वाटले तसच काहीसे त्यांना म्हणायचे होते का? बहुतेक हो ! पण त्या क्षणी वाटून गेलं,आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एक space निर्माण करते. आपल्या नानाविविध भावना आपल्या आयुष्यात एक space निर्माण करतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटना, आपल्याला येणारे अनुभव , आपल्या क्रिया - प्रतिक्रिया स्वताची अशी एक space निर्माण करत असतात.
इतकेच काय तर आपला भूतकाळ एक मोठी space रुपी जागा व्यापून असतो, वर्तमान काळ तो भूतकाळ होईस्तोवर लागणारी थोडा space रुपी वेळ मागत असतो, आणि भविष्यकाळाला आपण Space रुपी मोकळीक देत असतो. :)
या SPACE चे manufacturing Unit म्हणजे बहुतेक आपले मनच असावे . म्हणूनच जितकी demand होईल तितका supplyमिळेल हे नक्की ! पण या बाबतीत जास्त demanding नसलेले च बरे.. कारण दिल बच्चा है जी , दिल कच्चा है जी , सगळे मानले तरी .. दिल सा कोई कमिना नही ...हि गोष्ट पण विसरून चालणार नाही !
असो. माझ्या साठी तरी हा एक 'SPACE'tial किस्सा होता म्हणून माझ्या दृष्टीकोनातून मी त्यावर लिहिले. एखाद्या साठी space म्हणजे कदाचित keyboard वरचा Spacebar हि असू शकेल !
-----
वृन्दा
Keep Writing. Happy Writing.
No comments:
Post a Comment