कित्येक रात्री सहज असं वाटतं
तुझ्या घरी येऊन मन,
ड्रिंक्स घेत बसतं.
तुझ्या घरी येऊन मन,
ड्रिंक्स घेत बसतं.
सोफ्यावरती तुझा पुस्तकांचा पसारा
खिडकीमधून डोकावत वहातो
निशिगंधाचा वारा.
खिडकीमधून डोकावत वहातो
निशिगंधाचा वारा.
मंद मंद विझणारी तिन्ही सांझेची वेळ
सूर्यास्ताच्या सुस्त प्रकाशात
सावल्यांचा खेळ.
सूर्यास्ताच्या सुस्त प्रकाशात
सावल्यांचा खेळ.
ढगाआडून उमटावी एकेक चांदण्यांची कुडी
अंधारासम चढत रहावी
धुंद तुझी थोडी.
अंधारासम चढत रहावी
धुंद तुझी थोडी.
ग्लास रिकामा, हात रिकामा, आपली रिकामी मने
फडफडून वाऱ्यासवे बोलतात
पुस्तकांची पाने.
फडफडून वाऱ्यासवे बोलतात
पुस्तकांची पाने.
वाट पाहून, आवरून, सावरून तुझे घर
उभे प्रश्न डोळ्यात पुन्हा
ग्लासात उत्तर.
उभे प्रश्न डोळ्यात पुन्हा
ग्लासात उत्तर.
ऎटीत तुझी सावली दारावरती रेलून
रोखून पाहते मला
चष्मा नाकावरती आणून.
रोखून पाहते मला
चष्मा नाकावरती आणून.
डोळ्यांच्या ओल्या कड़ा, पापण्यांना ओझे
तुला फक्त पाहण्यासाठी
हे हाल माझे.
हे हाल माझे.
इतकाच तुझा, सहवास आठवणीत राहतो
मन मौन धरते
मेंदू सुन्न होतो.
मन मौन धरते
मेंदू सुन्न होतो.
No comments:
Post a Comment