Friday, 11 January 2013

अभिसारिका


 








गुरुवारच्या दिवशी भर दुपारी ३ वाजता हि चर्चगेट  स्टेशन गर्दीने भरून गेलेले. कॉलेज सुटायची वेळ आणि बरर्याच अंतराने सुटणाऱ्या लोकल्स त्यामुळे गर्दी बर्र्यापैकी दिसत होती.
 गर्दी पासून दूर एका कोपऱ्यात नेत्रा indicator  कडे पाहत  उभी  होती.  उद्या पासून तिची १० दिवसांची सुट्टी सुरु होणार होती आणि आज तयारी साठी घेतलेली अर्धा दिवस रजा. तिला घरी जायची घाई होती पण हि गर्दी नको होती.Indicator वर पुढची स्लो ट्रेन लागायची ती वाट पाहत होती. तसे हि तिला चर्नी रोड ला उतरायचे होते म्हणजे चर्चगेट वरून  जेमतेम दोन स्टेशन्स. समोरचा इंडिकेटर बदलत नव्हता. पुढची ट्रेन लागत न्हवती. तिला कंटाळा तर खूप आलेला.. Taxi ने घरी जायचा हि विचार येउन गेला पण त्याचा हि कंटाळा आलेला. आजचा दिवस उत्साहा एवजी आळसाने भरला होता. 
स्वतः शी विचार करता करता च अगदी नकळतपणे भोवताली घडत असलेल्या गोष्टीं कडे तिची नजर गेली. आजूबाजूला सुरु असणारी धावपळ तिला मजेशीर वाटू लागले. रोज वेळ कुठे असतो हे सगळं पाहायला? सकाळी ऑफिस ला येताना आणि संध्याकाळी घरी जाताना आजूबाजूला आपल्यासारखीच जनता असते. पण आत्ता या वेळी मात्र नुसतं तारुण्य भरलेले आहे स्टेशनात. मधेच कुठे कोपऱ्यात डब्बे पोचवून आलेल्या डब्बेवाल्यांचा घोळका, या वेळेला निवांत चहा पीत होता. दोन पोलिस मामा तोंडात तंबाखूची मळी टाकून स्टेशनात येरझार्या घालत होते. स्वतः एक हि शब्द न बोलता शु पोलिशचा ब्रश जवळच्या पेटीवर मारत बूट पोलिश करणारे काका, सांकेतिक भाषेत गिर्हैकाना बोलवत होते. तर दुसरी कडे अनौंसमेंट करणारी बाई एकीकडे आपले काम चोख  बजावत होती. तिऱ्हाईताच्या नजरे पहिले तर समोर घडणाऱ्या सगळ्या गोष्टी तिला क्षणमात्र चित्रपटासारख्या कृत्रिम भासायला लागल्या. लहानपणी किती कुतुहुल वाटायचे ह्या अनौंसमेंट करणाऱ्या बाईच! ती खरीच वाटायची. आई म्हणायची.... फक्त या बाईच्या आज्ञेवर सारे पुरुष पळतात. तेव्हा मार्मिक कळायचं नाही पण आत्ता आठवल्यावर त्यातली गंमत कळते.
"नेत्रा भिडे?" एक तरुण अचानक नेत्रा ची तंद्री मोडत समोर येउन उभा राहिला.चेहऱ्यावर  अर्धवट हास्य आणि डोळ्यामध्ये ठासून भरलेले कुतुहूल होते.
" Sorry, पण तुम्ही नेत्रा भिडे आहात ना?"
नेत्रा ने होकारार्थी मान  डोलवली. 
" हो, पण आपण? मी नाही ओळखलं. Sorry."
आपण नेत्रा भिडे शीच बोलतोय या आनंदात तो म्हणाला, "एक तरी guess कर."
नेत्रा ला थोडे अवघडल्यासारख झालं. एका अनोळखी  तरुणाला त्याच्या कडे पाहून, ओळखायच? अरे, कोण आहेस तू? आणि लगेच हे guess कर वगैरे फालतू जोक काय मारतोयस? जा इथून." आत्ता कुठे जरा वेगळा विचार करत होते. तर हे दत्त कुठून आले? मनातल्या मनात नेत्रा ने मन मोकळ करून घेतलं.  
"ओळखलस का, नेत्रा? "
"माफ करा, नाही ओळखत मी तुम्हाला. आणि मला असा guess पण करता नाही येत.  मला उशीर होतोय मी येते." त्याच्या response ची अजिबात वाट न बघता नेत्रा उगाच त्याच्यापासून दूर  कुठल्यातरी  दिशेने चालू लागली. मनात मात्र कुठे तरी थोडी का होईना थोडी उत्सुकता लागून राहिलेली, कोण असेल तो? स्वतःच्या विचारात तिला लक्षात देखील आले नाही कि ती स्टेशन मधून बाहेर जाणाऱ्या subwayकडे जातेय. Subwayची एक पायरी उतरली तेव्हा तिच्या लक्षात आले कि ती स्टेशनातून बाहेर पडतेय..
"बापरे! आज काही खरं नाही. आता लौकर घरी गेलच पाहिजे."   स्वताशीच पुटपुटत ती उलटी फिरली आणि  platform  च्या दिशेने चालू लागली.Indicator पर्यंत चालत येताना तिला परत तो मुलगा दिसला. तो किंचित हसला.पण त्याच्याकडे नं  पहिल्यासारख करून ती पुढे सरकली.
'त्याचे डोळे ओळखीचे वाटतायत. आवाज हि ऐकल्यासारखा वाटतोय.
पण कुठे? केंव्हा? ह्या ऑफिसात ? कि मागच्या ऑफिसात? शाळेत तर नाहीच, कारण माझी मुलींची शाळा होती. पण मग कोलेजात? कि masters करताना? कोण असेल तो? कोण कोण कोण? हलक्या भुरक्या डोळ्यांचा कोण मुलगा होता? एका बाजूने  तिरके smile करणारा कोण मुलगा? कुठे बर्र पहिले असेल याला?'
एक दोन क्षण विचारात गेले. तंद्री लागली आणि तिला तो अनोळखी मुलगा आठवला. "Ohh God, I  know  him. Yes! Yes, I know  him.  He is अद्वैत. अद्वैत इनामदार. Ohh God,  I don't  believe this!
आता काय करू? काय करू, आता? परत जाऊ ? त्याला भेटू? त्याच्या शी बोलू? कि कि नको जाऊ देत आत्ता. राहू देत. पण इतके अनपेक्षित कसं घडू शकतं?" काही सेकंद विचारात गेले आणि आणखी वेळ न घालवता, नेत्रा परत वळली. तिच्या पुढे तिचे मन पळत गेल. त्याला शोधू लागलं. तो तिथे न्हवता जिथे तिला भेटलेला.तिने त्याला आजूबाजूला शोधलं. तो तिथे दिसत न्हवता. तो तिथे कुठे हि न्हवता.
"मला तुला भेटायचं अद्वैत!" नेत्रा स्वतःशी च बोलली.
'इतक्या गर्दीत तो दिसणार तरी कसा? त्याने मला ओळ्खल आणि मी त्याच्या कडे तोंडदेखल पहिले सुद्धा नाही.  आता काय उपयोग?'
शेजारून जाणाऱ्या बाईचा धक्का लागला आणि नेत्रा विचारातून बाहेर आली. समोर च्या घड्याळात पहिले तर साडे तीन होत आलेले. आता तर निघालेच पाहिजे. स्वतःलाच ओरडत ती परत platformच्या दिशेने चालायला लागली.
"दोन मिनिटात गाडी स्टेशनात लागेल. ५ मिनिटात सुटेल. १० मिनिटात चर्नी रोड. आणि ५ मिनिटात घरी. म्हणजे अर्ध्या तासात घरी. " नेत्रा platform च्या कडेला उभी होती. लौकर ट्रेन मध्ये चढून सीट पकडता येईल म्हणून. दुरून गाडी येताना दिसत होती. हळूहळू. ती स्टेशनात शिरणाऱ्या ट्रेन कडे पाहत होती. तिच्या पुढच्याच gents compartment समोर ट्रेन ची वाट पाहत, हातातल्या कॉफ्फी चे भुर्के घेत उभा असलेला कोणी तिला मधून मधून अद्वैत सारखा भासत होता. कधी एकदा तो चेहरा इथे वळतोय असे तिला झालेले. कसा होता अद्वैत? इतक्या वर्षानंतर मला अजून हि लक्षात आहे तो जसाच्या तसा.
"अद्वैत चे डोळे किती छान होते. पण केवढी मस्ती करायचा. एक नंबर चा उनाड आणि आगाऊ. मगाशी इतका शांत कसा वाटत होता. आवाज पण तसाच आहे. नेत्रा पुन्हा एकदा विचारात गुंग झालेली आणि दुसरीकडे तिचे  पूर्ण लक्ष त्या पाठमोऱ्या व्यक्ती कडे होते. ट्रेन जवळ येत होती, ट्रेन चा होर्न वाजतच होता, बाजूच्या बायकांनी कल्ला करत होत्या, ट्रेन मधून उतरणाऱ्या बायका तिच्या दिशेने हात हलवत होत्या, सगळे काहीतरी एकसारखे ओरडत होते, मागून बायकांचा आवाज वाढतच गेला इतकेच काय तर समोरच्या त्या gents compartment समोर तिच्या दिशेने पाठ करून उभे असेलेले  चेहरे तिच्या दिशेने वळले, आणि तो कॉफ्फी घेऊन  उभा असलेला चेहरा तिला दिसला पण.. पण.. इतक्यात  कोणी तरी तिला मागे खेचले आणि गाडीचा होर्न जोरात कानाशी वाजून गेला.

"काय ग ए हिरोइन, घरी जायचंय कि वरती जायचंय? एवढा आवाज शेवट पर्यंत ऐकू आला नाही का?" तिला मागे खेचणाऱ्या बाईने चढ्या आवाजात तिला दमटावले. 

"हो बाजूला, बघ ! माझी विंडो सीट पण गेली तुझ्या मुळे . जा आता आत जा."
"अः हो, ते घरी जायचय. वरती नाही. sorry मावशी सीट बद्दल आणि Thank you पण " 
 मावशी डब्यात शिरल्या. आणि नेत्रा चे लक्ष platform वर गेले. एव्हाना platform ची गर्दी डब्ब्यात शिरलेली.
"काय करू आता? गाडी सुटायला अजून ५ मिनिटं  बाकी आहेत. नुसतं  डोकावून तर बघते डब्यात."
नेत्रा लगेच gents compartmentच्या दिशेने निघाली. प्रत्येक खिडकीशी डोकावून बघू लागली.. अगदी या टोकापासून  त्या टोकापर्यंत.अगदी पुढच्या डब्याच्या शेवटच्या खिडकी पर्यंत ती जाऊन आली. पण तो दिसलाच नाही.
"मला भास झाला का? असेल हि.
 ट्रेन आता काही क्षणात सुटणार होती. त्यामुळे नेत्रा परत वळली. जाताना ती परत खिडकीत डोकावून जात होती. अखेरीस, पहिल्या  दरवाजात उभा असलेला अद्वैत तिला दिसला. तिने  एक सुटकेचा श्वास सोडला.
 धत्त! खिडकीत बघत बसले नुसती. दरवाज्यात बघितलच नाही. नेत्रा स्वताशीच हसली.
अद्वैत! धीर करून तिने त्याला हाक मारली.  
हाक एवढी हळू आवाजात होती.. कि अद्वैत ला ऐकायला गेली नाही.  मोठ्या आवाजात हाक मारली पाहिजे. तिने एकदा घसा खाकरला. आणि जोरात हाक मारली.  "अद्वैत"
तिची हाक आणि ट्रेन चा भोंगा एकमेकात मिसळून गेले. ट्रेन निघाली! ट्रेन निघाली, "अरे, अरे अद्वैत!" नेत्रा हात हलवून त्याचे लक्ष वेधून घेत होती. मान उंच करून घोळक्यात त्याला शोधत होती. ट्रेन जागेवरून हलली. नेत्रा आणखी panic झाली.
"अद्वैत! अद्वैत"
अखेरीस अद्वैत च लक्ष नेत्रा कडे गेल.."ए नेत्रा, तू खाली काय करतेयस? ट्रेन तर सुटली."
ती त्याच्या कडे पाहून हसली. "हो!Nice to meet you! अद्वैत.
ती हात हलवून त्याला bye करू लागली.
अद्वैत आतून लगबगीने दरवाजात आला आणि तो पण तिला bye करू लागला..
पण दुसर्याच क्षणी त्याचे मन बदलल.
"ए, नेत्रा थांब! मी उतरतोय"
ट्रेन ने अजून फार वेग घेतला न्हवता. अद्वैत ट्रेन मधून उतरला. नेत्रा तिथेच उभी होती. दोघे एकमेकांकडे पाहुन हसले. अद्वैत नेत्रा जवळ गेला.. मगाशी तुला भेटल्यावर वाटलं तू इतकी बावळट कशी झालीस? पण  ते judgement चुकीचे होते. तू अजून हि पूर्वी इतकीच धीट आहेस. I Like this about you. नेत्रा हलकी हसली.
"आता मला गाडीतून खाली उतरवलं  आहेस तर एक एक कॉफी घेउयात. काय? चालेल ना?"
अद्वैत च्या ऑफर ला नेत्रा नाही म्हणू शकली नाही.  आपल्याला  लौकर घरी जायचंय. उद्या सकाळी सकाळी चुलत भावाच्या लग्नाला इंदौर ला निघायचंय, या सगळ्या गोष्टी ती दुर्लक्षित करून ती अद्वैत ला कॉफी साठी हो म्हणाली. दोघे हि स्टेशन जवळच्याच एका कॉफी हाउस  मध्ये गेले. दोघे हि चालत असताना अगदी जुजबी बोलले. कॉफी हाउस मध्ये अद्वैत ने एक निवांत कोपरा शोधला. नेत्रा ला थांबायला  सांगून स्वतः  ऑर्डर द्यायला गेला. 

नेत्रा एकदा स्वताशीच  हसली. अजून हि तिचा विश्वास बसत न्हवता कि आज ती अद्वैत ला इतक्या वर्षांनी भेटतेय. कॉलेज मध्ये फक्त अकरावी बारावीची दोन वर्ष एकत्र होतो. त्यानंतर त्याने आर्किटेक्चर करायचे ठरवले आणि नेत्रा ने तिचे B.A. या दोन वर्षात मैत्री कधीच झाली नाही आमची. होते ते फक्त वैर. सदानकदा एकमेकाला टोमणे मारायचे, भांडायच. अद्वैत ला खोड्या काढायची वाईट सवय होती. असा एक हि दिवस गेला नसेल कि त्याने वर्गात काही खोडी किंवा मस्ती केली नाही.सगळे त्याला मस्तीखोर म्हणून च ओळखायचे. पण एक किस्सा मला चांगलाच आठवतोय. एकदा एका लेक्चर ला तो माझ्या मागच्या बेंच वर बसलेला. तिथे लेक्चर संपवून प्रोफेसर वर्गाबाहेर पडले आणि इथे अचानक माझ्या बाजूला बसलेली मैत्रीण जोरात किंचाळली. अक्खा वर्ग आमच्या कडे पाहायला लागला. मला कळलच नाही काय झालय?

तेव्हां मैत्रिणीने बोटाने मला रबरी खोटा बेडूक  दाखवला. बेडकाला पाहून माझ्या बरोबर बाजूच्या आणखीन दोन मुली किंचाळल्या. साहजिकच होते ते. वर्गात एकचं  हशा पिकला. मी जेव्हा अद्वैत कडे पाहिले तेव्हां  तो मित्रा कडे पाहून म्हणाला.. थोडक्यात नेम चुकला. त्याचा तो खोटा बेडूक उचलून मी खिडकीतून  बाहेर फेकून दिलेली तेव्हा कुठे थोडी शांती मिळालेली. 
"नेत्रा, here is your Coffee! अद्वैत कप ठेवता ठेवता म्हणाला. 
So, whats up मिस भिडे? Oops.मिस आहेस कि मिसेस झालीस कोणाची? " 
"मला झेलणारा अजून भेटला नाहीये मला. मिस भिडे आहे तोपर्यंत." हसत हसत नेत्रा ने उत्तर दिले.
"तुझे status मात्र बदलेले दिसतेय. त्या शिवाय इतका शांत अद्वैत अशक्यच. सांग ना!"
"अगं, मी सध्या single  आहे." अद्वैत उगाच हसत म्हणाला.
"सध्या' म्हणजे? 
"सांगतो. आधी तू सांग. काय सुरु आहे सध्या? अजून हि चर्नी  रोड ला राहतेस कि कुठे शिफ्ट झालीस?आणि नोकरी वैगेरे काय म्हणतेय?"  अद्वैत चे प्रश्न एकामागून एक आले.
"अरे तिथेच राहते मी अजून. नोकरीला इथेच चर्चगेटला आहे. एका  MNC मध्ये Legal Operations पाहते. BA LLB केल मी.  झाली २ वर्ष या नोकरीला. घरी आत्ता माझ्या लग्नाचे वेध लागलेत. पण मला घाई नाही. उद्या चुलत भावाच्या लग्नाला इंदौरला चालेलेय. मुलगी इंदौर ची आहे. बघू तिथेच कोणी आवडला तर! आणखी खास अजून तरी काही नाही." नेत्रा ने देखील एका दमात सारी उत्तर देऊन टाकली. 
'आत्ता तू  तुझ्याबद्दल सांग काहीतरी.'
"कॉफी घे, गार होतेय. मी तुला मगाशी स्टेशन वर बराच वेळ पाहत उभा होतो. जितका वेळ तू इंडिकेटर कडे पहात उभी होतीस तितका वेळ. खात्री करून घेत होतो. तू नेत्रा आहेस कि तुझ्यासारखी आणखी कोणी. इतक्या वर्षांनी पाहिल्यावर थोडा वेळ लागला तुला ओळखायला जसा तुला मला ओळखायला लागला. शेवटी धीर केला आणि बोललो तुझ्याशी.मला वाटले न्हवते आपण असे कॉफी पीत बसू इथे. पण खूप बरं वाटतंय कि आपण भेटलोय. कोलेज मध्ये तुला मी अनेकदा त्रास दिलाय. कधी तुझ्या bag मध्ये पेपरचे बारीक बारीक तुकडे टाकलेले. कधी तास सुरु असताना तुझ्या आणि तुझ्या मैत्रिणींच्या ओढण्याची टोकं  एकमेकाला बांधलेली. तू घाबरवण्यासाठी एकदा खोटा बेडूक पण टाकलेला तुझ्या अंगावर. पण नेमकी तो बाजूच्या मुलीच्या अंगावर पडला. आठवतंय का तुला?" अद्वैत सांगता सांगताच पोट धरून हसायला लागला. त्या वेळेस नेत्राला त्याचा किती हि राग आलेला असला तरी आत्ता मात्र ती पण त्याच्या खोड्या वर हसायला लागली.

"सगळ आठवतंय! खासकरून तो बेडकाचा  प्रसंग. खरंच, कसा होतास तू ? माझा विश्वासच नाही बसत कि तू इतका शांत झालायस."
अद्वैत ची आणि तिची पहिल्यांदा नजरानजर झाली. अगदी एकमेकांचे  हाडवैरी असेले तरी त्याचे काळेभोर बोलके डोळे तिला नेहमी आवडत. त्याच्या बोलक्या डोळ्यावर तिचे खूप प्रेम होते. त्याच्या वरचा राग त्याच्या डोळ्यांकडे पाहिल्यवर निघून जायचा. "नेत्रा, मला आठवतच नाही आपण का भांडायला लागलो. कारण काय होते? but I am really sorry for that."
"Its OK. Apology accepted." नेत्रा ने जर भाव खात उत्तर दिले.

"नेत्रा" अद्वैत म्हणाला. 'मला खूप बोलावसे वाटतय आज. तुझ्याशी. पण आपण एकमेकांना ओळखून हि अनोळखी आहोत. आयुष्यात बराच काही घडून गेलंय. असं वाटत वेळीच शहाण्यासारखा वागलो असतो तर आज आयुष्यात जे हवय ते मिळवू शकलो असतो. मी सगळ्याना त्रासच दिला. तुला पण. तू भेटलीस आणि असा वाटलं तुझी माफी मागावी."

'अरे अद्वैत, अस काय बोलतोयस. इतका हि नाही काही त्रास दिलास तू मला. आणि त्या वयाला ते सगळ साजेसं  होतं. तेव्हां अक्कल असते का? आणि जर तुला बोलावस वाटतंय तर खरच मन मोकळं कर. कधी कधी मित्रांमध्ये मन हलकं केल कि बर असतं. आपले हि काम होते आणि भरपूर सहानभूती हि मिळते."
अद्वैत हलकं हसला. पण त्यानंतर पुढची काही वेळ अद्वैत बोलतच होता. बारावीला कॉलेज बदलल्या नंतर ते थेट आत्तापर्यंत सार काही जणू एका दमात बोलून गेला. आर्किटेक्चरच्या second yearला कॉलेज सोडून मित्रांच्या संगतीने Hotel Managementला त्याने admission घेतली. ते नीट जमेना म्हणून एक वर्षात तिथून बाहेर पडला  आणि बाबा आणि काका बरोबर काही महिने कापडाच्या व्यवसायात घालवून पहिले. तिथे हि रस येईना म्हणून  पुन्हा आर्किटेक्चर ला तिसऱ्या  वर्षाला admission घेतली. बरोबरचे मित्र पुढे निघून गेलेले. त्याचा मोठा भाऊ शिकायला States ला निघून गेला. तेंव्हा दारूच व्यसन कधी लागलं कळलचं नाही. ४ वर्षांपूर्वी  आई बाबा सहलीला जात असताना झालेल्या अपघातात त्याचे बाबा हे जग सोडून गेले. आईला recover व्हायला दोन महिने गेले. त्याच्या एकंदर स्तिथीकडे पाहून बाबा गेल्यावर त्याच्या काकांनी बिसनेस ची सगळी सूत्र स्वतःच्या ताब्यात घेतली. नावाला काही पैसे एक रकमी आई ला दिले. पण त्या पुढे पैशांचा काही संबध ठेवला नाही. दादा ने तिथेच परस्पर लग्नं केल आणि ३ वर्षांपूर्वी एकदा चार दिवस येउन भेटून गेले. ते दोघे हि आता States ला च कायमचे शिफ्ट झालेत. दादा महिन्याला एक ठराविक रक्कम बँकेत ट्रान्स्फर करतो आणि तेव्हांच काय तो फोन करतो. आईला नुकताच paralysisचा attackयेउन गेलेला.आई जेमतेम सावरतेय तेव्हांच  अद्वैतच  break up झाल. ४ वर्षांच्या serious affair नंतरच हे break up त्याला अगदी मुळापासून हलवून गेल. आता घरचं  बाहेरचं सारे स्वताच बघायला शिकलाय.घरी एक वेळच जेवण बाहेरून आणतो आणि एक वेळ तो स्वतः बनवतो. हे सगळं करता करता दारू सुटली. अक्कल आली. शिकण्यात इंटरेस्ट आला. छोट्या मोठ्या नोकऱ्या सुरूच होत्या. अखेरीस बऱ्या पगाराची नोकरी लागली. एवढच सुख.
  
बोलता बोलता त्याचे डोळे कधी पाणावले त्याच्या लक्षात हि आले नसेल. अद्वैत इतका का बदलला हे त्याच्या प्रत्येक वाक्यातून कळत होते. जगाची फिकीर आणि भीती नसलेला हा मुलगा आता प्रत्येक गोष्ट जबाबदारीने पूर्ण करतोय. नेहमी मित्रांच्या घोळक्यात रमणारा आज स्वताला एकटा समजतोय. कधी एकेकाळी दुसर्यांना दिलेल्या त्रासासाठी त्यांची माफी मागतोय. 
नेत्राला आधी विश्वास बसत नव्हता पण लौकरच तिला याची खात्री पटली जेव्हा अद्वैतने तिला  "घरकामासाठी विश्वासु बाई असेल तर सांग" असं  विचारले. 
"एका मागून एक असे  प्रसंग घडत गेले कि सावरायला वेळच मिळाला नाही." अद्वैत अखंड बोलत होता. 
नेत्राला हि त्याला अडवायचं  न्हवत. किंबहुना त्याला ऐकायचं होते. 
थोड्या वेळाने त्याने डोळे मिटून घेतले आणि मान मागे सोफ्यावर ठेवली. 
त्याच्या बंद डोळ्यांकडे पाहून नेत्रा ने इतका वेळ रोखलेला आवंढा गिळला.
"मी तुझं  सांत्वन तरी कस करू? अद्वैत, शांत हो. आत्ता या क्षणी मी काय बोलू, मला सुचत नाही. पण या पुढे कधी हि माझी कुठे मदत लागली तर मला नक्की सांग. जे करता येईल ते करेन."  नेत्रा अद्वैत कडे पहात म्हणाली.
त्याने हलकी मान डोलवली. 
"अग चल निघुयात. ५ वाजत आलेत. पाहिलेस का? आणि मी पण काय बोलत बसलो."
पुढच्या काही मिनटात त्यांनी  स्टेशनातून अंधेरीला जाणारी ट्रेन पकडली. ट्रेन मध्ये नेत्रा सतत अद्वैत चा विचार करत होती. त्याच्या बोलक्या डोळ्यांच्या ती नेहमीच प्रेमात होती पण आज तिला आपण अद्वैतच्या प्रेमात पडणार, अशी शंका आली. चर्नी रोड स्टेशनला नेत्रा खाली उतरली. अद्वैत दिसत नव्हता. ट्रेन चा भोंगा ऐकू आला. आणि इतका वेळ दाबून ठेवलेला हुंद्काबाहेर आला. तिला एकदम रडायला आले. डोळे घट्ट  मिटून घेत तिने डोळ्यांना रुमाल लावला.
ट्रेन चा आवाज दूर जाईपर्यंत ती तिथे तशीच उभी होती. ती घरी जायला वळली आणि समोर तिला अद्वैत दिसला. 
तू का रडत होतीस, नेत्रा?
"अद्वैत? तू? तू ट्रेन मधून उतरलास? का?" तिने गहिवरल्या आवाजात विचारले.
"तुझा शेवटचा निरोप घेण्यासाठी उतरलो. पुढच्या ट्रेन ने जाईन. तेवढीच 'दोन मिनिट! नेत्रा,एक विचारू? तुझा फोन नंबर देशील?" त्याने त्याची डायरी पुढे केली.
नेत्रा ने तिचा नंबर त्याला लिहून दिला आणि स्वतः देखील त्याचा नंबर लिहून घेतला. तिने एकदा ट्रेन च्या दिशेने पहिले. दूरवर दुसरी ट्रेन येताना दिसत होती.
"चल अद्वैत, आपण पुन्हा थोडावेळ एकत्र घालवू. गप्पा मारू."
"अग मला हि खूप आवडले असते. पण नको. आता तू घरी जा. तुला तयारी करायचीये. नेत्रा, तुझ्याशी बोलून मला खूप बरं वाटले. तुझी माफी मागितल्यावर मन खूप हलकं झालंय. एक हरवलेला मित्र सापडला, ओळख असून हि किती अनोळखी होतो आपण!  माझा तुझ्यावर कधीच राग न्हवता. तू हुशार होतीस, तुझा group छान होता. सगळ्या activitiesमध्ये तू भाग घ्यायचीस. सगळ्यांशी छान बोलयाचीस. मला हि वाटायचं तुझ्याशी  बोलावस वाटायचं, पण आपल बोलणे असा काही त्या दोन वर्षात कधीच झाल नाही. आणि नंतर ते राहूनच गेलं." नेत्राच्या पाणावलेल्या डोळ्यांकडे पाहत तो पुढे म्हणाला.. "नेत्रा ट्रेन येतेय., मला निघायला हवं. अगं, अस नाही कि माझ्यावर काही आभाळ कोसळलंय. नाही काही जगावेगळे घडलंय. फक्त इतकंच कि मला सावरायला वेळ मिळत न्हवता. पण बघ ना, मी किती खूप शिकलोय यातून. इतक्या वर्षानंतर भेटूनहि तुला तो बदल जाणवला. जो अद्वैत आधी होता तो परत कधीच दिसणार नाही. मला पण हा, आजचा मीच बरा वाटतो. हा अद्वैत लोकांना आवडतो. बाकी बारीक सारीक सुखं दुःखं हि असणारच. So,Don't you worry!" अद्वैत तिचा निरोप घेत घेत तिला म्हणाला.
"अद्वैत, काळजी घे. परत कधी भेटशील?" नेत्रा  म्हणाली.
दूरवर दिसणारी ती ट्रेन आता platform ला लागली. अद्वैत ट्रेन मध्ये चढला; दारातच उभा राहिला. 
"नेत्रा, ठरवून भेटण्यात मजा नाही गं! भेटलो तर असच कुठेतरी, कधीतरी. आणखी एक, मी तुझा नंबर घेतलाय खरा. पण मी आपणहून फोन नाही करणार. तुझा नंबर म्हणजे मला एक दिलासा राहील, आपले कोणीतरी आहे म्हणून. तू फोन करावास अशी हि अपेक्षा नाही. तसही, मी घरून फारसा बोलू नाही शकणार. असो, तू निघ आता. उशीर झालाय तुला. मगाशी Indicator कडे पाहत जशी उभी होतीस तशीच लक्षात राहशील माझ्या आयुष्यभर . . "
ट्रेन हळू हळू वेग घ्यायला लागली. " मी थांबते इथे ट्रेन जाईपर्यंत. फोन कर, अद्वैत."
त्याने एक दीर्घ श्वास सोडला. आणि तिचा निरोप घेतला. 

ट्रेन दिसेनाशी झाली आणि जड मनाने नेत्रा घर कडे वळली.
अद्वैत चा फोन तिला कधीच आला नाही. नेत्रा ने त्याला मध्ये दोन तीन वेळेला फोन केलेले. फोन लागला नाही..शेवटी एकदा त्याला लग्नाचे आमंत्रण द्यायला म्हणून नेत्राने डायरी काढलेली. अद्वैत चा नंबर होता म्हणून खास जपून ठेवलेली. पण त्या दिवशी लग्नाच्या गोंधळात डायरी जी  गायब झाली ती झालीच. सगळे घर शोधून झाले, सगळी उलथा पालथ करून झाली पण डायरी अखेरपर्यंत मिळाली नाही. वेळेनुसार गोष्टींचा विसर पडत गेला. काल आज उद्या करता करता दिवस पाखरांसारखे भुर्रकन उडून गेले.  

आज या गोष्टीला एक बारा वर्षं उलटून गेली.आईच्या आजारपणाच्या निम्मिताने आज नेत्राने तिच्या आईचा खण आवरायला घेतला आणि साड्या आवरता आवरता एका जुन्या साडीच्या घडीतून तिची डायरी खाली पडली. एक क्षण धक्का बसला. श्वास थांबला. पुढच्या  क्षणी तिला पहिला आठवला तो अद्वैत! ती भेट. ते क्षण. त्या मनमोकळ्या गप्पा आणि अद्वैत. पुन्हा पुन्हा अद्वैत.
अद्वैत चा नंबर, त्याचे नाव आणि त्याची ती भेट सारं सारं तिच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा घडून गेल. अगदी जसं होतं तसं. इतक्या वर्षानंतर हि तिने घरचा फोन नंबर बदलू दिला न्हवता. कधीतरी अद्वैत चा फोन येईल. म्हणून. कदाचित त्याला मदत हवी असेल किंवा पुन्हा मन मोकळं करायचं असेल. पण अद्वैत म्हणल्याप्रमाणे त्याने आपणहून फोन केला नाही. एकदा नव्या उमेदीने तिने फोन उचलला. डायरीत अद्वैत ने लिहिलेला त्याचा नंबर तिने परत एकदा लावून बघितला - पण यावेळेस देखील तिला पूर्वीसारखाच प्रतिसाद आला.  "ये नंबर मौजुद नाही है।" कृपया दुबारा डायल करे।" 
अश्रुंच्या ओल्या आठवणी घेऊन  तिची डायरी  परत एकदा मिटून गेली..
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
 

1 comment:

Ketaki Shinde said...

Khup surekh lihle aahes vrunda. Agdi guntle hote mi vachnyat. :)