Monday, 7 September 2015

चार ओळींचे काहीतरी



मी तुझ्याशी बोलत असते 
मी एकटी असल्यावर. 
शहाणे लोक मला वेडी म्हणतात 
कधीतरी हा प्रकार पहिल्यावर. 
--


पत्त्यांचा  बंगला बांधलाय मी
तो किती वेळ टिकणार ?
साधी फुंकर मारताच
सात मजले कोसळून पडणार.
--


झाडाचं  ते हिरवे पान 
अजून  हि वहीत ठेवलंय. 
कधीतरी वही उघडल्यावर 
ते दिसतं ,
तुझ्या माझ्या सारखं 
म्हातारपणाची जाळी  ल्यायलेल. 
--


मागून नवऱ्याची हाक आली
कि वही आपोआप बंद होते
तुझं माझ्यावरच प्रेम आणि
त्याचा शरीरस्पर्श याची जाणीव होते.
--


पेनाने पुस्तकावर लिहिलेले 
तुला आवडत नाही म्हणून 
पेन्सिलीने लिहतोय 
बघ,तुझ्या किती गोष्टी मी 
अजून हि लक्षात ठेवतोय. 
--


मी बोलण्यापेक्षा लिहण्याचे काम
चांगले करतो
समजवण्या पेक्षा समजण्याचे काम
चांगले करतो.
--


मी सारे पहात होतो 
पण माझा उपयोग नाही झाला. 
माझ्यासमोर त्या इवल्या पाखराने 
गच्चीवरून जीव दिला. 
--


तसे तुझे डोळे मला
अजिबात आवडत नहित.
पण तू समोर आल्यावर,
तुझ्या डोळ्यात पाहिल्याशिवाय
रहावत नाहि.
--


असं बरेचदा होत असते   

 आपल्या बरोबर 
नातं  नकोसं  वाटत 
चांगले सुत जमल्यावर
--

मी तुझ्या जवळ आले कि
तुला मी नकोशी होते.
अन दूर गेल्यावर म्हणतोस,
अगं वेडे , अस काय करतेस?
--

तुझं मन जर मला वाचता आले असते 
अवघ्या काही तासात 
अख्खं पुस्तक संपवलं असतं. 
--



तुझे माझे लागे बांधे
आणखी काही वर्षात विरून जातील.
जेव्हा तुझा नवरा आणि माझी बायको
एकमेकांना  आदरपूर्वक नमस्कार करतील.
--

चंद्र उसना आणलाय मी ,
आजच्या आपल्या भेटीसाठी. 
थोडा थोडा परत देऊ 
पुढल्या पोर्णीमेसाठी. 
--

माझ्या नकळतच तुझा ओला स्पर्श,
मला होऊन जातो.
नुसती टाळी सुद्धा घेताना हात,
प्रत्येक बोटाला शिवून जातो.
--


तुझं येणं  हि आता
 वादळासारखे झालंय . 
आताशा लोकाना सहज कळत,
इथे नुकतच सारे उध्वस्त होऊन गेलंय. 
--


तुझ्या कुशीत शिरण्यासाठी
मन फार आतुर होते.
मलाच थोडं छळण्यासाठी
माझ्याशीच ते फितूर होते.
--


तुझं मला समजावणं 
मला फार आवडतं. 
म्हणून तर हे मन,
सारखं चुका करतं. 
--


माझा मनस्वीपणा अलीकडे
प्रत्येकालाच खटकायला लागलाय.
तू पण त्यातलीच एक झालीस बहुतेक,
कारण माझा फोन आजकाल मधेच
"cut" व्हायला लागलाय.
--


तुझ्या तक्रारींच्या पत्रांनी,
कपाट आता भरत आलंय. 
पण एका हि पत्रात म्हंटले नाहीस,
जाऊदेत! या वेळी तुला माफ केलंय. 
--


तू तेव्हाच समजायला हवे होतेस
मी तुला विसरलोय .
जेव्हा मी म्हंटले,
आता तुझ्या फक्त थोड्या आठवणी आहेत.
--

समुद्र म्हणाला नदीला,
आता पुरे झाले तुझे हे वागणं
मला गोड करायाच्या नादात 
स्वत: खारट होते राहणं



No comments: