एक दिवस नकळतपणे तुझ्या जवळ यायची ओढ लागली आणि ती तशीच अजून जिवंत आहे. तेव्हां, त्या वयाला ते सारे शोभणारे होतं. माझ तुझ्यावर (एकतर्फी) प्रेम होतं. मला तुझ्याबद्दल जे काही वाटायचं ते प्रेमाने ओतप्रोत भरलेले होतं. आणि ते चूक हि न्हवत.
तेव्हा तुझ्या नकळतच मी तुझ्यात जगले आणि तुला मी माझ्यात जगवलं. मनाला वाटेल तेव्हां ते तुला माझ्याजवळ आणायचं. कधी सकाळी सकाळी गुलाबी थंडीतली तुझी ऊब, कधी दुपारच्या निवांतपणात स्वयंपाक घरातल्या ओट्याजवळ रुंजी घालत , कधी संध्याकाळी दिवे लागणीला देवासमोर नमस्कार करताना सुगंधित होऊन , तर कधी रात्री; सारी निजानीज झाल्यावर हक्काने हात धरून, जस मनाला हवे तसे ते मोकाट वागायचं.
कधी नखरेलपणे मी हि तुला छेडायच. तुझ्या अस्तित्वशुन्य स्पर्शात हि मी मोहरून जायचे. माझ्या भावी आयुष्याची स्वप्नं तुला केंद्रबिंदू ठरवून रंगायची. मी मनातल्या मनात सतत तुझ्या भोवती रेंगाळायचे. माझ्या अखंड अस्तित्वाची मालकी मी तुला दिलेली. तुला हवा तसा तू त्याचा उपभोग घ्यावा म्हणून. तुझ्या काल्पनिक स्पर्शात बहरून जाताना अस प्रत्यक्षात आत्ता या क्षणी घडावे अशी सुप्त ओढ लागायची. तुझ्या कुशीत सामावून अगदी निर्धास्त आणि नि:शब्द होऊन मी तुझ्या छातीवर डोकं ठेवावं, तुझ्या हातात हात गुंफून घ्यावेत, तुझ्या हृदयाची धडधड ऐकत मी शांत व्हावे.
आणि तू अलवार पाठीवरून हात फिरवत तुझ्या माझ्यावरच्या प्रेमाची खात्री द्याविस. सात जन्मांचे तुझे माझे लागेबांधे तिथेच घट्ट होऊन जावेत. या आयुष्यात अखेरपर्यंत तुझ्या सोबतीला सुखं दुखात मी तुझी होऊन समर्थपणे तुझ्याबरोबर उभी रहावं. बस्स !
तुझ्यावर आंधळेपणाने प्रेम करत राहिले आणि तुला बोलून हि नाही दाखवू शकले.
जेव्हा मोकळेपणाने तू मनातल्या गोष्टी मला जिवलग मैत्रीण म्हणून सांगितल्यास तेव्हा आनंदाच्या देखाव्यात दुखाचे अश्रू वाहून गेले. माझ्यासारखी तू हि स्वप्नं बघितलीस, मला सांगितलीस पण त्यात मीच न्हवते . तुझी स्वप्नं वास्तवात आणलीस मित्रा तू! तुला हवा होता तो जोडीदार तू मिळवलास.
आणि मी ? मी नाही करू शकले परत कोणावर प्रेम तुझ्याइतके. आता सरतेशेवटी देखील मला तुझी मैत्रीण म्हणून राहण्यात दु:ख नहिये. मी समाधानी आहे तुझ्या मैत्रीत. अन तू हि मैत्री तशीच जपलियेस. या नात्याहून दुसरे सुंदर नाते काय असणार होते?
तुझी न होताच तुझी होऊन जगण्याचं सुख मला तरी कसं लाभणार होतं ?

No comments:
Post a Comment