माझ्या घराच्या बाल्कनीतल्या लॉफ्ट मध्ये चक्क एका कबूतराने घरटे थाटलेय.(कबूतराने घरटे बांधल्याचे पाह्ण्यात/ एकीवात नाही म्हणून नवल)तर या लेकाने कुठून कुठून वाळके गवत, झाड़ाच्या फांदया, दोरे गोळा केलेत.
कहर म्हणजे पठ्याने आमच्याच कूण्ड़ीतून पाने तोड़ून त्याची गादि केलिये, इतके दिवस मीच दुर्लक्श केलेले पण आजच कळले दो दूणे चार व्हायची वेळ जवळ आलिये. यात भर म्हणून त्याला रोज भेटायला येणारे त्याचे नातेवाईक ही बरेच आहेत.त्यांच्या गुटुर गुटुर गप्पा..अविरात चालणारी फड़फड़, बाल्कनिचे स्वच्छतागृहात झालेले रूपांतर, आणि माझ्या कुंडीतल्या रोपट्यांची वाट लागलेली पाहून मी त्याला हकलवायाचा खूप प्रयत्न केला पण माझ्याच घरात राहून मलाच घाबरवतो लेकाचा! आता बाळन्त्पण इथेच होणारसे दिसतेय.आणि हो दूसरी खबर ये है के...नूकतेच आणखी एका कबूतराने लोफ्टच्या दुसऱ्या कोपऱ्यात अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे!
No comments:
Post a Comment