Tuesday, 14 June 2016

भ भुताचा

आहट, मानो या ना मानो, x-फाइल्स, वो, The Chair, सारख्या सीरियल्स बंद काय झाल्या,  आणि आजुबाजूची भूतं,
पिशाच्च, चेटकिणी, हडळी, मुंज्ये, चकवा, सारे जणू एकत्र VRS घेऊन निघुन गेले.
आताशा त्यांच्या वार्ता येणं बंदच झालयं! माणसांची दहशत वाढली म्हंटल्यावर त्यांनी आपलं काम आटोपतं घेतलं.  वाढत्या शहरीकरणामुळे त्यांच्या हक्काच्या जागा हरवल्या. माणसांची भीती गेली. अंधश्रद्धा गेली. खरी भूतं पाहिलेली माणसं ही गेलीच बहुतेक.
माझी आज्जी देशावरची. जळगावची. ती काही बाही चकवा लागलेल्या माणसांच्या गोष्टी सांगायची. आई सिंधुदुर्गतली ती ही गावकडच्या तिने ही अशाच ऐकलेल्या दोन चार गोष्टी सांगयाची.
आमच्या गिरगावतल्या खोताची वाड़ी, जापानी बाग,  भटवाडी,  आमची गायवाडी, केळेवाड़ी, या गोष्टी साठी जाम फेमस. इतकेच काय आताची वर्ल्ड क्लास सैफ़ी हॉस्पिटल ची इमारत ही एकेकाळी खंडर म्हणून प्रसिद्ध होती. एकदम रामसेच्या मूवीज़ मधली भासायची. आता या गोष्टी किती खऱ्या खोट्या, Man-made,  Psychological, की नुसतेच् भास् ? माहीत नाही.  जे काही असेल ते. जो रोमांचकारी अनुभव या गोष्टी ऐकताना यायचा तो जसाच्या तसाच  आजही राहतो.

लहान असताना आम्ही चाळीतली उनाड पोरं कधीमधी रात्री अपरात्री  रात्रभर जागायचो. हीच शहनिशा करायला. रात्री गप्पा ही याच चालयच्या. पांडु नावाचा एक गड़ी दुसऱ्या मजल्याच्या बाहेरच्या  कटयावर झोपयाचा; त्याला काही विचारलं की तो हकलून लावायचा. असं काही कोणाला सांगयाच् नसतं. हे एकच उत्तर द्यायचा. तसा तो ही रात्री मेल्यासारखाच झोपयाचा. दिवसभराचा राबता. आणि काय? बिचारा!
तर हौसे खातर आम्ही जितक्या वेळेस जागलो तेव्हा एकदा ही एकल्याप्रमाणे बुटकी पैंजणवाली बाई, कांबळ ओढून बसलेला उल्ट्या पायाचा बुआ, किंवा हिरवी साडी घातलेली केस मोकळे सोडून एकटीच् अपरात्री परसाकडे  जाणारी सवाष्ण् कधी दिसली नाही. हां, रस्त्यावरची कुत्री मात्र अशीच रात्री गळा काढून रडायची. एकामागून एक. कितीतरी वेळ.  समोरचे वड अणि पिंपळ अगदी वेळ साधुन सळसळायचे. भीत-भीत आम्ही डोकं  बाहेर काढून बघितलं की मात्र सारं शांतच वाटायच. काहीच वेगळं घडलं नसल्यासारख्.  शाळेतल्या मैत्रिणी मिळून एकदा प्लांचेट ही केलेलं एक मैत्रिणीच्या घरी. दोन तीन तास कॉइन वर बोट ठेवून दुखयला लागलेलं बोट. अन बसून बसून bottom ही. रात्री जितकी फाटायची सकाळी तेवढं पोटभर हसायचो स्वत: वर.  मोठे होत गेलो तशी हळूहळू आमची हौस मावळत गेली. भीती ही, पण कदाचित् पूर्ण नाही. आमिर खानचा 'तलाश' आला तेव्हा परत कीड़े वळवळले. अजुन काही योग नाही आलाय Practicleचा. थोडिफार नावासाठी भीती आहे माझ्या मनात तरी. कधीतरी  हॉरर मूवीज़ बघताना आठवतं ते सारं. आज ही असच आठवलं मग लिहूनच काढल.
वाटलं म्हणून शेयर केल. वेळ ही अनायसै जमलीच.
शुभरात्री

No comments: