सांगेल भव्य काही ऐसी शायरी माझी न्हवे
तो कवींचा मान तितुकी पायरी माझी न्हवे.
आम्ही अरे अपुल्या साध्याच जीवना सन्मानितो
संमानितो हासू तसे आसव संमानितो.
जाणतो अंती अम्हाला मातीच आहे व्हायचे
नाहीतरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे
मानतो देवासही न मानतो ऐसे नव्हे
मानतो इतकेच कि तो अमुचा कुणी नव्हे.
आहोत असे बेधुंद आमची धुंदही साधी न्हवे
मेलो तरी वाटेल मेला दुसरा कुणी आम्ही नव्हे.
-
भाऊसाहेब पाटणकर
(वा. वा. पाटणकर)
'जिंदादिल' या संग्रहातून
मराठीत शायरीची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या पैकी एक म्हणजे पाटणकर . त्याचं फार साहित्य उपलब्ध नाही आहे. हि कविता प्रथम कुठे वाचनात आली ते ही आत्ता आठवत नाही. मध्यंतरी घरातल्या कुठ्ल्याश्या पुस्तकातून हा कवितेचा कागद ओघळला आणि मनात परत परत हि घोळत राहिली. आज योग आला आणि दिंडीत उतरली. बघा आवडतेय का !
No comments:
Post a Comment