केसात उमलणाऱ्या
या चंदेरी बटांना
रंगात कोणत्या रंगवू
या मोहक छटांना?
Vrundawan.
This place is like everyone else's. My blog is personal not private though. Where it differs over yours? Might be at compositions and encounters of emotions. I am writing. To lighten some anonymous burdens that like every individual have.This blog is expression of my own side which over the years ready to come forward. WELCOME: "Loose your head to find your heart."
Tuesday, 14 June 2016
मोह
पण हृदयातून ऋतू,
सरता सरला नाही.
आठवणींची पानगळ तरी कुठे झाली?
पण,
तुझा मोह आता उरला नाही..
भ भुताचा
आहट, मानो या ना मानो, x-फाइल्स, वो, The Chair, सारख्या सीरियल्स बंद काय झाल्या, आणि आजुबाजूची भूतं,
पिशाच्च, चेटकिणी, हडळी, मुंज्ये, चकवा, सारे जणू एकत्र VRS घेऊन निघुन गेले.
आताशा त्यांच्या वार्ता येणं बंदच झालयं! माणसांची दहशत वाढली म्हंटल्यावर त्यांनी आपलं काम आटोपतं घेतलं. वाढत्या शहरीकरणामुळे त्यांच्या हक्काच्या जागा हरवल्या. माणसांची भीती गेली. अंधश्रद्धा गेली. खरी भूतं पाहिलेली माणसं ही गेलीच बहुतेक.
माझी आज्जी देशावरची. जळगावची. ती काही बाही चकवा लागलेल्या माणसांच्या गोष्टी सांगायची. आई सिंधुदुर्गतली ती ही गावकडच्या तिने ही अशाच ऐकलेल्या दोन चार गोष्टी सांगयाची.
आमच्या गिरगावतल्या खोताची वाड़ी, जापानी बाग, भटवाडी, आमची गायवाडी, केळेवाड़ी, या गोष्टी साठी जाम फेमस. इतकेच काय आताची वर्ल्ड क्लास सैफ़ी हॉस्पिटल ची इमारत ही एकेकाळी खंडर म्हणून प्रसिद्ध होती. एकदम रामसेच्या मूवीज़ मधली भासायची. आता या गोष्टी किती खऱ्या खोट्या, Man-made, Psychological, की नुसतेच् भास् ? माहीत नाही. जे काही असेल ते. जो रोमांचकारी अनुभव या गोष्टी ऐकताना यायचा तो जसाच्या तसाच आजही राहतो.
लहान असताना आम्ही चाळीतली उनाड पोरं कधीमधी रात्री अपरात्री रात्रभर जागायचो. हीच शहनिशा करायला. रात्री गप्पा ही याच चालयच्या. पांडु नावाचा एक गड़ी दुसऱ्या मजल्याच्या बाहेरच्या कटयावर झोपयाचा; त्याला काही विचारलं की तो हकलून लावायचा. असं काही कोणाला सांगयाच् नसतं. हे एकच उत्तर द्यायचा. तसा तो ही रात्री मेल्यासारखाच झोपयाचा. दिवसभराचा राबता. आणि काय? बिचारा!
तर हौसे खातर आम्ही जितक्या वेळेस जागलो तेव्हा एकदा ही एकल्याप्रमाणे बुटकी पैंजणवाली बाई, कांबळ ओढून बसलेला उल्ट्या पायाचा बुआ, किंवा हिरवी साडी घातलेली केस मोकळे सोडून एकटीच् अपरात्री परसाकडे जाणारी सवाष्ण् कधी दिसली नाही. हां, रस्त्यावरची कुत्री मात्र अशीच रात्री गळा काढून रडायची. एकामागून एक. कितीतरी वेळ. समोरचे वड अणि पिंपळ अगदी वेळ साधुन सळसळायचे. भीत-भीत आम्ही डोकं बाहेर काढून बघितलं की मात्र सारं शांतच वाटायच. काहीच वेगळं घडलं नसल्यासारख्. शाळेतल्या मैत्रिणी मिळून एकदा प्लांचेट ही केलेलं एक मैत्रिणीच्या घरी. दोन तीन तास कॉइन वर बोट ठेवून दुखयला लागलेलं बोट. अन बसून बसून bottom ही. रात्री जितकी फाटायची सकाळी तेवढं पोटभर हसायचो स्वत: वर. मोठे होत गेलो तशी हळूहळू आमची हौस मावळत गेली. भीती ही, पण कदाचित् पूर्ण नाही. आमिर खानचा 'तलाश' आला तेव्हा परत कीड़े वळवळले. अजुन काही योग नाही आलाय Practicleचा. थोडिफार नावासाठी भीती आहे माझ्या मनात तरी. कधीतरी हॉरर मूवीज़ बघताना आठवतं ते सारं. आज ही असच आठवलं मग लिहूनच काढल.
वाटलं म्हणून शेयर केल. वेळ ही अनायसै जमलीच.
शुभरात्री
रेडीओ जिंगल
--
महाराष्ट्र पोलिस
डास आणि दिवाळी
या दिवाळीला आपण पण फटाके एवजी डासांची ब्याट घेऊन जाणार फटाके वाजवायला.
च्यायला! डेंगी, मलेरिया, गुनिया, बनिया, न्युमोनिया,अमोनिया, साऱ्यांचा बंदोबस्त होऊन जाईल.
आणि फटाके भी फुटतील, प्रदुषणाशिवाय .
थाड! थाड! थाड ! थाड!
काव्यादिंडी
जिंदादिल
सांगेल भव्य काही ऐसी शायरी माझी न्हवे
तो कवींचा मान तितुकी पायरी माझी न्हवे.
आम्ही अरे अपुल्या साध्याच जीवना सन्मानितो
संमानितो हासू तसे आसव संमानितो.
जाणतो अंती अम्हाला मातीच आहे व्हायचे
नाहीतरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे
मानतो देवासही न मानतो ऐसे नव्हे
मानतो इतकेच कि तो अमुचा कुणी नव्हे.
आहोत असे बेधुंद आमची धुंदही साधी न्हवे
मेलो तरी वाटेल मेला दुसरा कुणी आम्ही नव्हे.
-
भाऊसाहेब पाटणकर
(वा. वा. पाटणकर)
'जिंदादिल' या संग्रहातून
मराठीत शायरीची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या पैकी एक म्हणजे पाटणकर . त्याचं फार साहित्य उपलब्ध नाही आहे. हि कविता प्रथम कुठे वाचनात आली ते ही आत्ता आठवत नाही. मध्यंतरी घरातल्या कुठ्ल्याश्या पुस्तकातून हा कवितेचा कागद ओघळला आणि मनात परत परत हि घोळत राहिली. आज योग आला आणि दिंडीत उतरली. बघा आवडतेय का !